Athani

हिरेकोडी येथील जैनमुनी प्रकरणातील आरोपीना 7 दिवसांची पोलीस कोठडी

Share

हिरेकोडी येथील जैनमुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या खून प्रकरणातील आरोपी नारायण माळी आणि हसनसाब दलायत या दोघांना 7 दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश चिक्कोडी प्रधान दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश चिदानंद बडिगेर यांनी दिले आहेत.
दोन्ही आरोपीना चिक्कोडीच्या मुख्य दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले.चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयातील
वैद्यकीय तपासणीनंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.चिक्कोडीच्या मुख्य दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश चिदानंद बडिगेर यांनी दोन्ही आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 17 जुलैपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .

Tags: