हिरेकोडी येथील आचार्य कामकुमार नंदी महाराज खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी तसेच स्वामीजींच्या रक्षणाची मागणी करून , बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे आज जैन समाजाचा मूक निषेध मोर्चा काढण्यात आला .


वरूरचे भीमसेन भट्टारक पट्टाचार्य श्री यांच्या नेतृत्वाखाली चिक्कोडी आरडी हायस्कूल ते एसी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला .कोल्हापूरच्या नांदणी मठाचे जिनसें भट्टारक पट्टाचार्य हे देखील या मोर्चात सहभाई झाले होते . आरडी हायस्कूलजवळ या मोर्चात सहभागी होण्यासाठी जैन बांधव , श्रावक श्रावक प्रचंड संख्येने सहभागी झाल्या होत्या . जैन समाजाचा ध्वज घेऊन , अहिंसा परमो धर्म , जियो और जिने दो असे फलक हातात घेऊन , प्रचंड जैन समुदाय या मूक मोर्चासाठी एकवटला होता . हिरेकोडी येथील आचार्य कामकुमार नंदी महाराज खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी तसेच जैन मुनींच्या रक्षणाची मागणी यावेळी सरकारकडे करण्यात आली
या आंदोलनात बेळगावसह शेजारील महाराष्ट्रातील भाविक सहभागी झाले होते .

खबरदारीचा उपाय म्हणून एसपी संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिक्कोडीत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त
ठेवण्यात या आला होता .
चिक्कोडीचे आमदार गणेश हुक्केरी, भाजपचे बेळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.


Recent Comments