Athani

कालव्यामध्ये पाणी सोडण्याच्या प्रकल्पाचा माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या हस्ते शुभारंभ

Share

भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अथणीचे माजी उपमुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सवदी यांच्या हस्ते हल्याळ उपसा सिंचनाद्वारे कालव्यामध्ये पाणी सोडण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर सवदी म्हणाले की, तालुक्यात भीषण दुष्काळ असून, जनतेला व पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची नितांत गरज असल्याने कृष्णा नदीचे पाणी हल्याळ जॅकवेल मधून वळविण्यात आले आहे. तालुक्यातील ८५ हजार हेक्टर क्षेत्रफळ आहे. यंदा मान्सूनचा पाऊस न पडल्याने कालव्याला पाणी सोडण्यास २५ दिवसांचा विलंब झाला आहे. नदीतील पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन कालव्यात पाणी सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. जीवनात पाणी मौल्यवान आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे ते म्हणाले. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कालव्यात पाणी सोडणे हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असले तरी आपल्या जमिनीपर्यंत पाणी नेण्यासाठी कालवे फोडू नयेत अशी विनंती केली आहे.

यावेळी काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष श्रीकांत पुजारी, युवा नेते चिदानंद सवदी, नेते सदाशिव बुटाली , शिवू गुड्डापूर, श्रीशैल नायक, शेखर कनकरेड्डी, शिवरुद्र घोलप्पनवर, रमणगौडा पाटील, महांतेश ठक्कनवर, नगरसेवक कलेशा मड्डी, राजू गुड्डावर, माजी सदस्य राजू गुड्डापूर आदी उपस्थित होते. अधिकारी के रवी, प्रवीण हुनसकट्टी, एरण्णा वाली व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Tags: