मागे घेतलेल्या वादग्रस्त कृषी कायद्यात एपीएमसी सुधारणा कायद्याचाही समावेश आहे. त्यामुळे बेळगावात उभारलेले खासगी होलसेल भाजीमार्केटही आपोआप रद्द होईल असे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, महिला भाजप सरकारने आणलेला एपीएमसी सुधारणा कायद्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच, शिवाय बाजार समित्यांचा नफाही लक्षणीयरीत्या घसरला. त्यामुळे या कायद्यांसह वादग्रस्त कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी केली आहे.

त्यामुळे या कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन बेळगावात उभारलेले खासगी एपीएमसी भाजीमार्केटही रद्द होणार आहे. कायदा आणि त्यातील तरतुदीच राहणार नसतील तर खासगी भाजीमार्केट कसे काय राहू शकते?, नव्या कायद्याचे स्वरूप काय असेल माहित नाही. परंतु खासगी एपीएमसीची तरतूद त्यात नसेल. कायदे मागे घेतलेत हे सत्य आहे असे त्यांनी सांगितले. बाईट.
बेळगावात बदली झालेले अधिकारी बेंगळूर सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याबाबतच्या प्रश्नावर, अनेक अधिकाऱ्यांची बेंगळूर सोडून यायची तयारी नसते हे खरे आहे. पण बेळगावही बेंगळुरपेक्षा काही कमी नाही. शिवाय नोकरी म्हटले की बदली वगैरे असणारच. खातेनिहाय प्रक्रिया सुरु असतात. काही लोकप्रतिनिधी आपल्याला हाच अधिकारी पाहिजे असा आग्रह धरतात. हे सर्वच पक्षांच्या सरकारमध्ये असते. बेळगावात केवळ पोलीस आयुक्त नियुक्ती व्हायची आहे. बुडा आयुक्त व अन्य पदांवर बदल्या झाल्या आहेत. संबंधित अधिकारी लवकरच सूत्रे स्वीकारतील असे त्यांनी सांगितले. बाईट.
बदल्यांबाबत मंत्री दबाव आणत असल्याच्या पुराव्यांचे पेनड्राइव्ह उघड करण्याच्या माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या विधानासंदर्भात बोलताना, त्यांना पेनड्राइव्ह कुठे उघड करायचे याचे स्वातंत्र्य आहे. सभागृहात त्यांना ते करता येणार नाही. प्रसारमाध्यमांसमोर ते उघड करू शकतात. पण तो त्यांचा विषय आहे. अधिवेशनात सोमवारपासून आठवडाभर चर्चेला संधी दिली जाणार आहे. विरोधक आपले म्हणणे त्यावेळी मांडू शकतात असे त्यांनी सांगितले. बाईट.
चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन स्वामीजींच्या हत्या प्रकरणात दोन प्रमुख आरोपींना अटक झाली आहे. वैयक्तिक कारणातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस तपास करत आहेत. दोन-तीन दिवसांत तपासात आणखी प्रगती होण्याची शक्यता आहे, पाहू काय होते असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.


Recent Comments