मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी मांडलेला अर्थसंकल्प पूर्णतः निराशाजनक, एका विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण करणारा असल्याची टीका माजी उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांनी केली. बेळगाव विमानतळावर आज, शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना निराणी म्हणाले की, सिद्दरामय्या एक ज्येष्ठ राजकारणी आहेत. चांगले बजेट देतील अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली आहे. राज्यातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. विशेषतः बागलकोट, विजापूरसाठी अपर कृष्णा योजनेत पुनर्वसनाच्या कोणत्याही ठोस योजना यात नाहीत.


मागील भाजप सरकारने आलमट्टी 524 मीटर वाढवल्याने विस्थापित होणाऱ्या गावांच्या पुनर्वसनासाठी 5 हजार कोटी रुपये ठेवून सांकेतिकरीत्या 10 जणांना निधी वाटप केले होते. ती योजना सुरु ठेवण्यासाठी या बजेटमध्ये तरतूद नाही. त्यामुळे कृष्णा तीरावरील लोकांची निराशा झाली आहे. अर्थसंकल्पातील 25% आश्वासनेही हे सरकार उरण करू शकणार नाही. 5 गॅरंटींसाठीच यांचा सर्व निधी खर्च होणार आहे. महिलाशक्ती संघांना कर्जमाफी देण्यावर चकार शब्द उच्चारलेला नाही. केवळ एकाच विशिष्ट समुदायाचे तुष्टीकरण करणारा आणि एकूणच निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे अशी टीका निराणी यांनी केली. बाईट.
भाजप प्रदेशाध्यक्ष किंवा विधानसभा विरोधी पक्षनेता पदाच्या शर्यतीत मी नाही असे स्पष्ट करून मुरुगेश निराणी म्हणाले की, पक्ष संघटनेत राहून पक्ष मजबूत करण्यात, राज्याच्या राजकारणात मला रस आहे. कुठे हरवले तेथे ते शोधण्याचा माझा स्वभाव आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कुठे पराभव झाला तेथे पक्ष मजबूत करणे हे माझे उद्दिष्ट आहे. पक्षाचे राज्य व राष्ट्रीय नेते देतील ती जबाबदारी मी पार पाडणार आहे. निवडणुकीत जय-पराजय स्वाभाविक आहे. माझ्या पराभवाला मीच जबाबदार आहे असे मानतो, विरोधी पक्षनेतेपदी पक्षाचे नेते लवकरच विशेष उमेदवार देतील, प्रतीक्षा करा असे मुरुगेश निराणी यांनी यावेळी सांगितले. बाईट.
एकंदर, काँग्रेस सरकारने मांडलेला अर्थसंकल्प राज्यातील जनतेची निराशा करणारा आणि एका विशिष्ट समुदायाचे तुष्टीकरण करणारा असल्याची टीका माजी मंत्री मुरुगेश निराणी यांनी केली आहे.


Recent Comments