सायकल हे आपल्या रोजच्या व्यायामासाठी अतिशय सोयीचे साधन आहे. त्यामुळे अनेकजण रोजच्या व्यायामासाठी सायकलचा वापर करतात. मात्र, धारवाड येथील एक माणूस गेल्या 22 वर्षांपासून प्रवासासाठी केवळ सायकलचा वापर करत आहे. मोटरसायकलला तर त्याने हातही लावलेला नाही अन ना कधी बसची प्रतीक्षा केलीय.

होय! गेल्या गेल्या 22 वर्षांपासून सतत सायकलचा वापर करणाऱ्या या अवलियाचे नाव शिवानंद बुदनूर असे आहे. तो मूळचा बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील यडहळ्ळी गावचा आहे. तो धारवाड तालुक्यातील बेलूर औद्योगिक परिसरात टाटा हिताची कंपनीत काम करतो.
जेव्हापासून तो कंपनीत जायला लागला तेव्हापासून तो आपल्या गावापासून कंपनीपर्यंत सायकलने जातो. इतकेच नाही तर त्याला अगदी 50 किलोमीटर दूर असलेल्या गावांमध्ये जावे लागते, तेंव्हाही तो सायकलनेच प्रवास करतो. गेल्या 22 वर्षांपासून तो कधी बसची वाट पाहत बसल्याचे उदाहरण नाही! त्याच्या या सायकल प्रेमामुळे तंदुरुस्तही राहण्यास मदत होते अन इंधनाची बचत, पर्यावरणाचे जतन होते हे विशेष!


Recent Comments