Belagavi

रोटरी क्लब ऑफ बेलगामच्या अध्यक्षपदी जयदीप सिद्धण्णावर

Share

रोटरी क्लब ऑफ बेलगाम चे २०२३-२४ या वर्षांसाठी नूतन अध्यक्ष म्हणून जयदीप सिद्धण्णावर आणि सेक्रेटरी म्हणून मनोज मायकल यांनी अधिकाराची सूत्रे स्वीकारली .
व्हॉईस ओव्हर : शहरातील फौंड्री क्लस्टर येथे झालेल्या कार्यक्रमात , प्रमुख पाहुणे तसेच इनस्टॉलिंग ऑफिसर विनयकुमार पै रायकर यांच्या उपस्थितीत रोटरीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी पार पडला .


या वेळी रोटरीचे या आधीचे अध्यक्ष , बसवराज विभूती यांनी आपल्या कार्याबद्दल माहिती देऊन , त्यांच्या कार्यकाळात सर्वानी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले .
यानंतर नूतन अध्यक्ष जयदीप सिद्धण्णावर तसेच सेक्रेटरी मनोज मायकल याना रोटरीच्या बॅच प्रदान करून , अधिकाराची सूत्रे सोपवली .
यावेळी जयदीप सिद्धण्णावर यांनी सांगितले कि , मी अनेक वर्षांपासून रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे . आता माझ्यावर जी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पडेन . गरीब लोकांसहित समाजासाठी कार्य करेन , यासाठी तुम्हा सर्व सदस्यांचे सहकार्य अपेक्षित आहे . रोटरीच्या आदेशानुसार काम करून , नवनवीन योजना टप्प्याटप्प्याने पूर्ण करू असे ते म्हणाले .

प्रमुख पाहुणे तसेच इनस्टॉलिंग ऑफिसर विनयकुमार पै रायकर यांनी सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या . रोटरीने कधीही स्वार्थी काम केले नाही . रोटरीच्या माध्यमातून गरीब मुलांचे शिक्षण , पाणी योजना , वैद्यकीय सुविधा , त्याचप्रमाणे आपत्कालीन सेवेत मदत कार्य केले आहे . जिथे मदतीची गरज असेल तिथे जाऊन काम करा . ग्रामीण भागातील लोकांना मदतीचा हात द्या . एकत्रित काम केल्याने रोटरीच्या नावलौकिक आणखी वाढेल असे सांगून त्यांनी नूतन अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनी सर्वाना विश्वासात घेऊन काम करण्याचे आवाहन केले . ( )
यावेळी रेणू किल्लेकर , संदीप नाईक , राहुल यांच्यासहित रोटरीच्या विविध विभागाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते .

Tags: