बेळगाव महानगर पालिकेच्या चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड आज परंपरेप्रमाणे बिनविरोध पार पडली.
बेळगाव महानगर पालिकेच्या सभागृहात आज चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कर आणि महसूल स्थायी समिती अध्यक्षपदी वीणा विजापूरे, सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती अध्यक्षपदी वाणी विलास जोशी, अकाउंट्स स्थायी समिती अध्यक्षपदी सविता मुरुगेंद्रगौडा पाटील यांची तर आरोग्य स्थायी समिती अध्यक्षपदी रवी धोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील, आमदार अभय पाटील, माजी आमदार व बेळगाव महानगर भाजप जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. निवडीनंतर महापौर-उपमहापौर आणि आजी-माजी आमदारांनी नूतन अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. फ्लो


यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील म्हणाले की, आज महापालिकेच्या सर्वच स्थायी समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. स्थायी अध्यक्षांची निवड होईपर्यंत नगरसेवकांना पूर्णतः अधिकार मिळत नाहीत. त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थाने नगरसेवकांना पूर्ण अधिकार मिळाले आहेत. त्यात तीन महिला आहेत हे विशेष. येत्या काळात चारही स्थायी समित्यांचे अध्यक्ष आणि महापौर-उपमहापौर मिळून बेळगाव शहर संपूर्ण राज्यात एक आदर्श शहर बनविण्यासाठी कार्य करतील. येत्या तीन-चार महिन्यात प्रामुख्याने कचरा आणि पाणी समस्या सोडवतील. इंदूर,सुरतसारख्या महापालिकांचा स्वखर्चाने अभ्यास दौरा करून बेळगाव शहराच्या समस्या सोडविण्यासाठी ते प्रयत्न करतील असे त्यांनी सांगितले. बाईट.
यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, स्थायी समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आज पाळली गेली आहे. बेळगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी, शहराच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्व अध्यक्ष व सदस्यांना सर्व ५८ नगरसेवक सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करून बेनके यांनी नव्या अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.


यावरी बोलताना सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या नूतन अध्यक्षा वाणी विलास जोशी म्हणाल्या की, आमदार अभय पाटील, अनिल बेनके आदींच्या मार्गदर्शनाखाली आज आमची अविरोध निवड केल्याबद्दल सर्व स्थायी सदस्यांचे मनापासून आभार. सर्वांच्या सहकार्याने आम्ही स्थायी समित्यांचा कारभार सक्षमपणे हाकू अशी ग्वाही त्यांनी दिली.
अकाउंट्स स्थायी समिती अध्यक्षा सविता पाटील आणि कर व महसूल स्थायीच्या अध्यक्षा वीणा विजापूर म्हणाल्या की, आमदार अभय पाटील व महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने आम्ही आमची जबाबदारी समर्थपणे पार पाडू. बाईट+बाईट.
एकंदर, उशिराने का होईना बेळगाव मनपाच्या सर्व चारही स्थायी समिती अध्यक्षांची परंपरेप्रमाणे बिनविरोध निवड अखेर पार पडली आहे. निदान आतातरी मनपाचा कारभार सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.


Recent Comments