दारुड्यांचा त्रास टाळता येण्यासारखा नाही. पण महिलांनी रणरागिणीचा अवतार धारण केला तर काहीही होऊ शकते. कुंकवाचा धनी दारूच्या विळख्यात सापडला असताना किमान आपली कोवळी पोरं तरी दारूच्या दुष्ट छायेपासून दूर राहावीत म्हणून महिलांनी दारू दुकानाला घेराव घालून ते बंद करण्याची मागणी केली.
होय, ही घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील असुंडी गावात घडली असून गावातील महिलांनी एमएसआयएलच्या दारूच्या दुकानावर धडक मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केला आहे. .


सौंदत्ती-बेळगाव मुख्य रस्त्यावर असुंडी-करीकट्टी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर असुंडी गावच्या हद्दीत हे दारूचे दुकान आहे. इथे संध्याकाळ झाली की दारुड्यांचा अड्डा भरतो. दारुड्यानी रस्त्यावर दुचाकी पार्किंग केल्याने ग्रामस्थांना जाण्यायेण्यास समस्या निर्माण होत आहेत. त्याशिवाय या मार्गावरून मुलींना, महिलांना चालणे कठीण होत आहे. मुलांना शाळा-कॉलेजात जाण्यास त्रास होत आहे. दारूचे गुलाम बनलेले पुरुष घरात बायका-मुलांना त्रास देत आहेत. याचा मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. कमावलेले सगळ्या पैशांची भर ते दारूच्या दुकानात करतात. त्यामुळे आमच्या गावातून हे दारूचे दुकान तात्काळ हलविण्यात यावे अशी मागणी करत गावातील शेकडो महिलांनी दारू दुकानावर मोर्चा काढला. दुकानाला घेराव घालून निषेध केला. माहिती मिळताच उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिला व ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. उत्पादन शुल्क अधिका-यांनी तात्काळ दारू दुकान स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिला व ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. फ्लो


Recent Comments