Belagavi

हुक्केरी शहरात एटीएम मशीनला आग

Share

हुक्केरी शहरातील बसस्थानक रोडवरील एटीएम मशीनला भल्या पहाटे भीषण आग लागली.
शहरातील नवीन बस स्टँड जवळ कसाई खाना रोडवर इंडिया एटीएम मशिनला अचानक आग लागली.स्थानिकांनी अग्निशमन केंद्राला माहिती दिली आणि कर्मचारी पोहोचेपर्यंत एटीएम आणि त्यातील पैसे जळून खाक झाले होते.
विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत असून, पोलिस तपासातच किती नुकसान झाले हे स्पष्ट होणार आहे.

Tags: