Belagavi

सेवा सुरक्षेसहीत विविध मागण्यांची करा पूर्तता

Share

कर्नाटक राज्य सरकारी वसतिगृहे तसेच निवासी शाळांच्या क आणि ड श्रेणी कर्मचाऱ्यांनी सेवा सुरक्षेसहीत , विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर , अनिश्चित कालावधीसाठी धरणे आंदोलन पुकारले आहे .राज्य कृषी मजूर संघाच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात येत आहे . यावेळी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी घोषणाबाजी केली .


या धरणे आंदोलनाविषयी माहिती देताना संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप तळवार यांनी सांगितले कि , १० वर्षांपासून आम्ही सरकारी हॉस्टेल तसेच निवासी शाळांमध्ये विविध कामांवर रुजू आहोत . आम्हाला सरकारने सेवा सुरक्षा देण्यासहीत आमच्या ३५ मागण्या पूर्ण कराव्यात अशा आशयाचे निवेदन आम्ही याआधीही दिले होते . मात्र त्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली . आता पुन्हा आम्ही जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन , आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी धरणे सत्याग्रह पुकारला आहे . आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास हे आंदोलन अनिश्चित कालावधीसाठी चालू ठेवू असा इशारा त्यानी दिला .

यावेळी अनेक कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते .

Tags: