Belagavi

मादिग समाजाला द्या विधान परिषद सदस्यत्व : अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Share

उत्तर कर्नाटकातील मादिग समाजाला , सरकारने विधान परिषद सदस्यत्व द्यावे अशी मागणी , समाजाचे नेते राजेंद्र ऐहोळे यांनी केली .
व्हॉइस ओव्हर : बेळगावमध्ये घेतलेल्या परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले कि , मादिग समाजाच्या पाठिंब्यामुळेच काँग्रेस सरकार राज्यात सत्तेत आले आहे . बेळगाव जिल्हा तसेच उत्तर कर्नाटकातील मादिग समाजामुळेच जास्तीत जास्त सीट्स विधानसभेवर निवडून आल्या आहेत . सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार आमच्या समाजामुळेच सत्तेत आले आहे .


आम्ही आमच्या समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही अनेक वर्षांपासून लढा देत आहोत . या सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात . तसेच बाहेरील लोकांना नियुक्त न करता स्थानिक लोकांना राजकारणात संधी द्यावी अन्यथा बंगळूरमध्ये राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला . (बाईट )
पत्रकार परिषदेत प्रशांत ऐहोळे , बसवराज अवरोळी , बाबू पुजारी , यल्लाप्पा हुदली आदी उपस्थित होते .

Tags: