बेळगाव शहरात कर्नाटक युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टतर्फे जिल्हास्तरीय पत्रकार दिन आणि प्रतिभा पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
व्हॉइस ओव्हर : जिल्हा युनिट बेळगाव आणि माहिती व जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हुक्केरी हिरेमठ येथील चंद्रशेखर महास्वामी यांच्या दिव्य उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.


यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी नितीश पाटील, माहिती विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, प्रदेश उपाध्यक्ष पुंडलीक बालोजी, जिल्हाध्यक्ष दिलीप कुरंदवाडे, उपाध्यक्ष यल्लाप्पा तलवार, राजा पाटील, श्रीशैल मठ , अरुण पाटील, मल्लिकार्जुन गोंडी, श्रीकांत कुबळे, मल्लिकार्जुन गोंडे, चेतन होलेप्पगोळ , राजशेखर पाटील आदी उपस्थित होते .

पत्रकारांना ओळखपत्र व नुकसानभरपाईचा धनादेश वाटप केल्यानंतर मंत्री लक्ष्मी म्हणाल्या की, शहरात पत्रकारगृहासाठी एक जागा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाईल व सुंदर इमारत बांधली जाईल व पत्रकार संघटनेसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली जाईल. असे त्यांनी जाहीर केले .
जिल्हाध्यक्ष दिलीप कुरंदवाडे यांनी 15 ऑक्टोबर रोजी बेळगाव शहरात आंतरराष्ट्रीय माध्यम कार्यशाळा होणार असल्याचे सांगून शासनाच्या वतीने सहकार्य करण्याची विनंती मंत्री महोदयांना केली.
नंतर पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.
शेवटी सवमिजींनी आशीर्वचन दिले .
यावेळी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.


Recent Comments