स्मार्टसिटी कामकाजाबद्दल जे आरोप केले जात आहेत त्याची चौकशी जरूर व्हावी असे आ . अभय पाटील म्हणाले .
बेळगाव महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीनंतर , प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते . ते म्हणाले कि जी कामे मंजूर झाली आहेत ते सुरु का आणि परवानगी नसताना जी कामे चालू असतील ती बंद करा . स्मार्ट सिटी कामकाजासाठी जर अधिकाऱ्यांनी झाडे तोडली असतील तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी . कायद्याच्या बाहेर जाऊन जे प्रकार सुरु आहेत ते बंद करा . मुलांच्या शिक्षण आणि मनोरंजनासाठी जी सीव्हीलेशन गॅलरी आम्ही उभारणार आहोत ती सर्व लहान मुलांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत उपयुक्त आहे . जनतेला ही सुविधा हवी आहे कि नाही याचा निर्णय आम्ही जनतेवर सोडणार असल्याचे ते म्हणाले .
एकंदर राज्यातील सर्वच स्मार्ट सिटीची चौकशी करण्याचा उच्चस्तरीय निर्णय झाला आहे . आ . अभय पाटील यांनीदेखील यास सहमती दर्शवली आहे .
Recent Comments