राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 200 युनिट मोफत वीज देण्याच्या ‘गृहज्योती’ योजनेसाठी नोंदणी करणे सक्तीचेच आहे. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना या, जुलै महिन्यापासूनच मोफत वीज मिळणार असल्याचा पुनरुच्चार ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी केला.
चिक्कमंगळूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज म्हणाले की, ‘गृहज्योती’साठी गेल्या 18 जूनपासूनच राज्यभरात नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कालमर्यादा घातलेली नाही. परंतु नोंदणी करणे सक्तीचे आहे. ज्यांनी नोंदणी केली असेल त्यांना जुलै महिन्यापासूनच लाभ मिळेल. त्यांना जुलैचे बिल शून्य येईल. परंतु ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांना या योजनेचा लाभ नोंदणी केल्यानंतरच मिळणार आहे. आतापर्यंत एकूण 85,91,005 वीजग्राहकांनी योजनेसाठी नोंदणी केली असून, अद्याप 1,28,08,995 ग्राहकांनी नोंदणी करणे बाकी आहे असे मंत्री जॉर्ज यांनी स्पष्ट केले. बाईट.
एकंदर, लवकर नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना गृहज्योती योजनेचा लाभ लवकर मिळणार असून उशिरा नोंदणी करणाऱ्यांना उशिरा लाभ मिळेल असे ऊर्जा मंत्री जॉर्ज यांनी स्पष्ट केले आहे.
Recent Comments