कुठल्याही मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये किंवा मंत्रिमंडळात कसलेही मतभेद, गोंधळ नाहीत असे स्पष्टीकरण उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी दिले.
बेळगावात संगोळ्ळी रायण्णा महाविद्यालयाच्या प्रांगणात संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात भाग घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. डॉक्टर सुधाकर पुढे म्हणाले की, आमच्या पक्षात किंवा मंत्रिमंडळात कसलाही गोंधळ नाही. विरोधक टीका करत राहतातच, पण जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे हेच आमचे ध्येय असून त्यावरच आमचे लक्ष केंद्रित आहे. कर्नाटक वीज नियामक प्राधिकरण ही स्वायत्त संस्था वीजदराचा नियमित आढावा घेत असते. त्यानुसार आढावा घेऊन तिने वीजपुरवठा कंपन्यांना दरवाढीची परवानगी दिली आहे. निवडणुकीपूर्वीच ही प्रक्रिया पार पडली आहे. निवडणुकांमुळे दरवाढ अमलात आली नव्हती. ती आता आता आली आहे. यात सरकारचा काही संबंध नाही. काहीही झाले तरी या मुद्द्याचा सरकारच्या गृहज्योती मोफत वीज योजनेवर कसलाही परिणाम होणार नाही. बोलल्याप्रमाणे आम्ही या महिन्यापासून योजना लागू करू असे त्यांनी सांगितले. राज्यातील अभूतांशी विद्यापीठांना स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. त्यांनी विध्यार्थ्यांना सर्व मूलभूत सुविधा देऊन विद्यापीठे चालवावीत असा नियम आहे. त्याचे कोणी पालन करत नसल्यास सरकार यात लक्ष घालेल असे सुधाकर यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. बाईट.



Recent Comments