Belagavi

लोळसूर येथे पावसासाठी गाढवाचे लगीन !

Share

पावसाळा सुरू झाला असून, शेतात नांगरणी करून बियाणे पेरण्यासाठी पावसाची वाट पाहणारे शेतकरी पावसाळा लांबल्याने दु:खी आहेत. त्यामुळे सलग धो-धो पाऊस कोसळावा यासाठी ते वरुणरायाची भाकणूक करत आहेत.


आता पाऊस आला असून शेतात रोपे फुटू लागली आहेत, मात्र पाऊसच नसल्याने गोकाक तालुक्यातील सर्व शेतकरी चिंतेत आहेत.
पावसाची प्रार्थना करून आता पावसाची करुणा भाकण्यात येत आहे. गोकाक तालुक्यातील लोळसूर गावात स्थानिकांनी परंपरेनुसार गाढवाच्या जोडीचा विवाहसोहळा पार पाडला. गावातील वडिलधारी आणि तरुणांनी बँडबाजा वाजंत्रीसह नाच-गाणी करून थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. लग्नाच्या मिरवणुकीप्रमाणे बँडबाजा लावून गाढवांची गावात वरात काढण्यात आली.
गाढवांची पूजा करून आरती करण्यात आली, शेकडो महिलांनी या गाढवांच्या लग्नात सहभागी होऊन पारंपरिक विवाहाची गाणी म्हटली. विधिपूर्वक गाढवाचे लग्न लावून ग्रामस्थांनी भोजनावळीवर ताव मारला.

Tags: