Belagavi

पाटील गल्लीत बोअरवेल कामकाजाचा शुभारंभ

Share

बेळगावमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आ . आसिफ उर्फ राजु सेठ प्रयत्नशील आहेत . शहरातील पाटील गल्ली भागात त्यांनी , नूतन बोअरवेल खोदण्याच्या कामकाजाचा शुभारंभ केला .
मान्सूनचा पाऊस लांबल्याने , बेळगाव शहरात पाणी समस्या उद्भवलीआहे . राकसकोप्प आणि हिडकल जलाशयात देखील पुरेसा पाणी साठा नसल्याने , शहरातील जनतेला पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी आ . आसिफ सेठ प्रयत्नशील आहेत . आपल्या प्रभंगामधील विविध भागांसाठी बोअरवेल मंजूर करून त्यांच्या खोदाईचे कामकाज सुरु केले आहे .


पाटील गल्लीत देखील अशा प्रकारे बोअरवेल खोदाईचे कामकाज आ . आसिफ सेठ यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आले .
यावेळी इथल्या नागरिकांच्या वतीने आमदारांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी बोलताना आ . आसिफ सेठ यांनी आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या जनतेला शुभेच्छा दिल्या . सर्वानी मिळूनमिसळून राहून आपला सण साजरा करा , बंधुभाव कायम ठेवा असे सांगितले . (बाईट )
यावेळी महिलांनी आपल्या भागातील समस्या आमदारांसमोर मांडल्या . यावेळी दत्ता गोडसे , इंद्रजीत पाटील , नगरसेविका पूजा पाटील , अजित गोडसे , पंकज सावंत तसेच या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: