Belagavi

उगार लायन्स क्लब जिल्ह्यातील आदर्श शाखा

Share

समाजातील गरजूंना ओळखून त्यांना निस्वार्थपणे मदत करणारी लायन्स क्लब ही एकमेव संस्था आहे. उगार येथील लायन्स क्लब शाखेच्या वतीने गेल्या 27 वर्षांपासून उद्योजक व समाजसेवक राजाभाऊ शिरगावकर यांनी सुरू केलेल्या या शाखेचे सदस्य उत्कृष्ट सेवा देत आहेत. ही जिल्ह्यातील मॉडेल लायन्स क्लबची शाखा आहे, असे लाईन्सचे गव्हर्नर शशिधरन नायर यांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी उगार खुर्द शहरातील बाल मंदिर सभाभवन येथे लायन्सचे गव्हर्नर शशिधरन नायर यांनी शाखेच्या पदाधिकाऱ्यांना 2023-24 या वर्षासाठी शपथ दिली आणि सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले.
शाखा अध्यक्षपदी लाईन्स सदस्य सचिन पोतदार, सचिव शुभा हेब्बल्ली, खजिनदार पी.बी.कुलकर्णी, प्रथम उपाध्यक्ष राहुल शहा, द्वितीय उपाध्यक्ष पायप्पा कुडवक्कलगी, सहसचिव डॉ.मोहन कटगेरी, सदस्यत्व समिती अध्यक्ष डॉ.बी.ए.पाटील यांनी सदस्यांना शपथ दिली.


शाखेचे तत्कालिन माजी अध्यक्ष ज्योतीकुमार पाटील, सचिव राजेंद्र पोतदार, खजिनदार डॉ.मोहन कटगेरी यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.
लायन्सचे ज्येष्ठ सदस्य व्ही.एस.देशपांडे, गिरीश गोसावी, आनंद कुंबार, बी.एन.चौगुले, मनीषा शहा, बी.बी.कागे, डॉ. एम.एन.भूमाज, एम.एन.साबदे, अमोल सारडे यांनी या सदस्याना शपथ दिली. लायन्सचे सदस्य जगदीश पटवर्धन, ए.बी.वन्नावर एस.व्ही.भट्ट यावेळी उपस्थित होते .

Tags: