चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात तीन दिवसांपूर्वी रस्त्यालगतच्या टेकडीवर जेसीबी व क्रेन एकमेकांवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या आणखी एका तरुणाचा इस्पितळात मृत्यू झाला.


28 वर्षीय विजय अशोक निकम असे मृत तरुणाचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी करोशी येथील घट्टगी बसवण्णा मंदिराजवळील रस्त्याच्या वळणावरून जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला टाळण्याच्या प्रयत्नात जेसीबी क्रेनचा ताबा सुटून ती नजीकच्या डोंगरावर कोसळली. यात सत्यप्पा कलाप्पा खड्डी (वय 27) यांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित 6 तरुण जखमी झाले होते.
गंभीर जखमी झालेल्या करोशी गावातील विजय निकम या तरुणाला पुढील उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा उपयोग न होता विजय निकम याचा मृत्यू झाला. विजयचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. विजय निकम याच्या मागे आई आणि दोन लहान बहिणी असा परिवार आहे.


Recent Comments