Belagavi

बेळगावात गानिग समाजाच्या 120 गुणी विद्यार्थ्यांचा समारंभपूर्वक सत्कार

Share

लिंगायत गानिग समाजाच्या विकासासाठी समाजबांधवांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची गरज आहे. तरच गानिग समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल असे आवाहन गानिग समाज अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष रवी काकती यांनी केले.
बेळगावातील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात रविवारी गानिग समाज अभिवृद्धी संघातर्फे समाजातील दहावी व बारावीच्या 120 गुणी विद्यार्थ्यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या सानिध्यात पार पडलेल्या या समारंभाचे स्वामीजींच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.


यावेळी बोलताना गानिग समाज अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष रवी काकती पुढे म्हणाले की, कोणत्याही समाजाचा विकास हा शिक्षणावरच अवलंबून असतो हे सिद्ध झाले आहे. गानिग समाजाची सर्वांगीण विकास होण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची गरज आहे. समाजाची अनेक मुले आज उच्च शिक्षण घेत आहेत. परंतु हे प्रमाण वाढण्याची गरज आहे. आपल्याच समाजाचे जलसिंचन तज्ञ दिवंगत एस जी बाळेकुंद्री यांना उत्तर कर्नाटकचे विश्वेश्वरय्या म्हणून ओळखले जाते. त्यांनी केवळ उच्च शिक्षण आणि प्रतिभेच्या बळावर ही ओळख मिळवली हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांचा आदर्श समोर ठेवून गानिग समाजाच्या मुलांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे, त्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे असे त्यांनी सांगितले. बाईट. यावेळी बोलताना सुजाता बाळेकुंद्री यांनी दहावी व बारावी परीक्षेत चांगली कामगिरी केलेल्या समाजाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांनी पुढील काळात उच्च शिक्षणातही असेच यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या. गानिग समाज अभिवृद्धी संघाच्या या उपक्रमाची त्यांनी प्रशंसाही केली.


यावेळी नेत्रा बाळेकुंद्री, प्रकाश बाळेकुंद्री, लिंगराज बागेवाडी, वसंत मोदगेकर, मंगला सिद्दण्णावर, मल्लाना सिद्दण्णावर, आनंद बागेवाडी, सुजय बाळेकुंद्री, के एन पाटील यांच्यासह गानिग समाजाचे विध्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: