Belagavi

जलकुंभ उभारणीसाठी आ. राजू सेठ यांच्याहस्ते पायाभरणी

Share

बेळगाव शहराची पाणीसमस्या सोडविण्यासाठी पोलीस मुख्यालय आवारात नवा जलकुंभ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आज बेळगाव उत्तरचे आ. आसिफ उर्फ राजू सेठ यांच्याहस्ते भूमिपूजा करण्यात आली. बेळगाव शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या तीव्र होत आहे. यावर्षी तर पाऊस लांबल्याने ही समस्या आणखीनच अधिक तीव्रतेने जाणवली. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेऊन आमदार राजू सेठ यांनी पाणीसमस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातूनच आज शहरातील पोलीस मुख्यालयाच्या आवारात 27 लाख लिटर पाणीसाठा क्षमतेच्या ओव्हरहेड टँक उभारणीसाठी भूमिपूजन केले.


यावेळी इन न्यूजशी बोलताना आमदार राजू सेठ म्हणाले की, बेळगावची पाणीसमस्या दूर करून संपूर्ण शहरात 24X7 पाणी पुरवठा योजना सुरु करण्याच्या हेतूने उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पोलीस मुख्यालयाच्या आवारात 27 लाख लिटर पाणीसाठा क्षमतेच्या ओव्हरहेड टँक उभारणीसाठी भूमिपूजन केले आहे. हे काम येत्या 8-9 महिन्यांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर महांतेशनगर, शिवबसवनगर, श्रीनगर आणि आसपासच्या परिसराला मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य होईल. आंबेडकर उद्यानात एक ओव्हरहेड टॅंक आहे. या दोन्ही ओव्हरहेड टँकमधून पुढील वर्षांपासून शहराला 24X7 तास पाणीपुरवठा करणे शक्य होईल. त्यामुळे बेळगावची पाणी समस्या संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाईट.
यावेळी महानगरपालिका आणि स्मार्टसिटी अधिकारी, ठेकेदार आदी उपस्थित होते.

Tags: