संघटित झाल्यानेच वीरशैव लिंगायतांचा विकास शक्य आहे असं मत निडसोशी सिद्धसंस्थान मठाचे उत्तराधिकारी निजलिंगेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केले.
बेळगावातील सुभाषनगरमधील वीरशैव लिंगायत मोफत महिला वसतिगृहाच्या सभागृहात वीरशैव लिंगायत समाजातील नवनिर्वाचित आमदार आणि मंत्र्यांचा सत्कार समारंभ आज उत्साहात पार पडला. याप्रसंगी आशीर्वचन देताना निडसोशी सिद्धसंस्थान मठाचे उत्तराधिकारी निजलिंगेश्वर स्वामीजी यांनी सांगितले की, कोणत्याही जाती-धर्माच्या, राज्याच्या, देशाच्या विकासात संघटन प्रमुख भूमिका निभावते. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा
या संघटनेची स्थापना सुमारे 100 वर्षांपूर्वी वीरशैव लिंगायत समाजाच्या कल्याणासाठी करण्यात आली होती. गेल्या 100 वर्षांत वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रगतीसाठी या संघटनेने खूप कार्य केले आहे. मात्र अजूनही कार्य करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवानी आणखी संघटित होण्याची गरज आहे. स्वामी विवेकानंदांनीही अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या उभारणीचे उदाहरण देत संघटनाचे महत्व अधोरेखित केले आहे. अध्यात्मिक आणि धार्मिक आधारावर संघटित व्हा असे आवाहन त्यांनी केले

प्रारंभी कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामीजी, निजलिंगेश्वर स्वामीजी, माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, खासदार मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी आदी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून समारंभाचे उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत महासभेच्या अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद होत्या. यावेळी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेतर्फे नवनिर्वाचित आमदार निखिल कत्ती,
बाबासाहेब पाटील, शशिकला जोल्ले, महांतेश कौजलगी, विधान परिषद सदस्य हणमंत निराणी आदी नूतन लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम जी हिरेमठ व अन्य मान्यवर उपस्थित होते. एम बी जिरली यांनी स्वागत व प्रास्ताविक केले


Recent Comments