Belagavi

शक्ती योजनेचा इफेक्ट : महिला प्रवासी-कंडक्टरमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी

Share

राज्य सरकारने सुरु केलेल्या महिलांसाठी मोफत बसप्रवासाच्या स्त्रीशक्ती योजनेचा वेगळाच इफेक्ट सौंदत्तीमध्ये पहायला मिळालाय. किरकोळ कारणावरून महिला प्रवाशांनी कंडक्टरची गळपट्टी पकडून धुलाई केल्याची घटना घडली असून, त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

होय,राज्य सरकारच्या स्त्रीशक्ती योजनेमुळे महिलांच्या बसप्रवासाला उधाण आले असून, त्यांना वेगळी शक्तीही मिळाल्याचे दिसून येतेय. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर 23 जून रोजी दुपारी किरकोळ कारणावरून महिला प्रवासी-कंडक्टरमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. कंडक्टरची गळपट्टी पकडून महिलेने त्याची धुलाई केल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
सौंदत्ती डेपोच्या बसच्या कंडक्टरने महिला प्रवाशांना लवकर बसमध्ये चढा असे सांगितल्यावरून वाद सुरु झाला. त्यावेळी काही महिलांनी कंडक्टरला धरा, मारा अशी चिथावणी दिल्याने एका आडदांड महिलेने कंडक्टरची गचांडी पकडली. ही घटना वायव्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक केए 22 एफ 1863 मध्ये घडली. कंडक्टर बसवराज भद्रण्णवर व महिला प्रवाशांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर अनर्थात झाले आणि कंडक्टरने महिलेला हात उगारला, त्यानंतर महिला प्रवाशांनी कंडक्टरला किरकोळ मारहाण केली. अनेकांनी अनेकप्रकारे समजावून सांगितले तरी महिला त्याचे शर्ट सोडायला तयार नव्हती.
याबाबत बस कंडक्टर भद्रण्णवर यांनी सांगितलं की, केवळ बसमध्ये लवकर चढा, बस सुटणार आहे, एवढे सांगितल्यावर वाद घालून मला मारहाण करण्यात आली आहे. माझ्या 26 वर्षांच्या सेवेत पहिल्यांदाच असे घडले आहे. माझीही चूक नसताना विजापूरच्या त्या महिला प्रवाशांनी मला मारहाण केली आहे असे त्याने सांगितले. बाईट.
दरम्यान, जखमी कंडक्टर भद्रण्णवर यांच्यावर सौंदत्ती आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. कंडक्टर आणि
महिला प्रवाशांमधील ही झटापट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

Tags: