Belagavi

गाव, तालुका केंद्रांवर रेशन तांदूळ खरेदी केंद्रे सुरु करा : भीमाप्पा गडाद

Share

अन्नभाग्य योजनेसाठी तांदूळ खरेदी करण्यासाठी प्रत्येक गावात आणि तालुका केंद्रांवर रेशन तांदूळ खरेदी केंद्रे सुरु करण्याची मागणी मुडलगी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी सरकारकडे केली आहे.

प्रसारमाध्यमांना एक व्हिडिओ संदेश निवेदन जारी करून माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी म्हटले आहे की, गोरगरीब भुकेले राहू नयेत या चांगल्या हेतूने सरकारने अन्नभाग्य योजनेत दहा किलो तांदूळ देण्याची घोषणा केली आहे. पण या योजनेला तांदूळ देण्यासाठी केंद्र सरकारने नकार दिला. त्यानंतर कर्नाटक सरकारने अन्य राज्यांकडेही तांदळासाठी संपर्क साधला आहे. मात्र अपेक्षीत यश मिळत नाही.

यापूर्वीही केंद्र सरकार रेशनवर सहा किलो तांदूळ देत आहे. मात्र अनेक गरीब कुटुंबे आपल्याला पुरेल इतका तांदूळ ठेवून अतिरिक्त तांदूळ विकत आहेत. राजकारण्यांच्या पाठीमागे फिरणारे काही प्रभावी लोक त्यांच्याकडून दहा रुपये किलो दराने हा तांदूळ विकत घेऊन साखर कारखान्यांना इथेनॉल व अन्य प्रकल्पांसाठी तसेच परराज्यांत वीस ते तीस रुपये किलो दराने विकून नफा कमवत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने गाव आणि

तालुका स्तरावर रेशन तांदूळ खरेदी केंद्रे सुरु करून १५ रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करावा. त्यामुळे शेतकऱ्यांनाही पाच रुपये अधिकचे मिळून त्यांचा फायदा होईल, असे भीमाप्पा गडाद यांनी सुचविले आहे.

Tags: