Belagavi

डॉ . बोरलिंगय्या यांचा बदलीनिमित्त निरोप समांरभ

Share

बेळगाव हा शांतिप्रिय प्रदेश आहे . त्याला गालबोट लागू देऊ नका , सर्वानी मिळून मिसळून राहा , त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन , पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी त्यांच्या निरोप समारंभात केले .
राज्य सरकाने आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांची अन्यत्र बदली केली आहे . बेळगावच्या पोलीस आयुक्तपदाची गेली दीड वर्ष समर्थपणे धुरा संभाळणारे डॉ . बोरलिंगय्या यांनादेखील आयजीपी पदी बढती देऊन त्यांची मैसूर येथे बदली करण्यात आली आहे . बेळगावच्या जिरगे सभागृहात त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते .
या निरोप समारंभात जिल्हाधिकारी नितेश पाटील , जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर , डीसीपी शेखर एच पी , लोकायुक्त एस पी महानंद नंदगावी , डीसीपी पी वि स्नेहा , केएसआरपी एसपी हंजा हुसेन यांनी तसेच , शहरातील विविध समाजाचे प्रमुख , संघटनेचे प्रमुख , डॉ . बोरलिंगय्या यांच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी जिल्हा पोलीस आयुक्तालयाच्या वतीने , तसेच विविध संघटनांच्या वतीने , डॉ . बोरलिंगय्या याचा सन्मान करण्यात आला .

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले कि , सरकारी नोकरीत सरकारचा आदेश अनिवार्यपणे , पाळावा लागतो . बदली हा सेवेचा एक भाग आहे . डॉ . बोरलिंगय्या यानी गेली दीड वर्षे , शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखली आहे . शिवजयंती , गणपती विसर्जन , निवडणुका , राजकीय कार्यक्रम , मोदींच्या रोड शो दरम्यान त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे . आम्हीदेखील त्यांच्यासोबत ,सर्वानी मिळून , शहराच्या आणि जिल्ह्याच्या हितासाठी काम केले आहे . बंगळूरमध्ये मी त्यांच्यासोबत काम केले आहे . बोरलिंगय्या हे अतिशय हुशार आणि शिस्तप्रिय अधिकारी आहेत . त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .


सत्कार स्वीकारून बोलताना , डॉ . बोरलिंगय्या म्हणाले कि , बेळगाव शहरात मागील दीड वर्षात काम करत असताना सर्वांचे सहकार्य लाभले . सर्व समाजाचे लोक एकजुटीने राहत असून , ते आपल्या समस्या अगदी बिनदिक्कत आमच्यासमोर मांडत होते . या काळात अनेक बंदोबस्त ठेवावे लागले . संपूर्ण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने , मोदींचा रोड शो , , जयंती मिरवणूका आणि अन्य कार्यक्रमावेळी शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळाले . इथे काम केल्याचे समाधान आहे . मैसूरला गेलो तरी इथे येऊन नक्की भेट देईन .आपलं शहर शांत ठेवा असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी , सीएआरसी सिध्दनगौडा पाटील , डीसीपी बरमनी , सदाशिव कट्टीमनी तसेच विविध समाजाचे प्रमुख उपस्थित होते .

Tags: