एका चोरट्याने महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना विजापूर शहरातील सॅटेलाइट बस स्थानकावर घडली असून तो स्थानिकांच्या हाती लागला आहे.
सुधा नामक महिलेचा मोबाईल हिसकावून चोर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्या मोबाईल चोराला पकडण्यात आले. यावेळी महिलेने पकडलेल्या चोरट्याला चोप दिला . त्यानंतर त्या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात नेण्यात आले . पोलीस अधिक तपस करीत आहेत तपास करत आहेत. ही घटना गांधीचौक पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत घडली.



Recent Comments