बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आज शहरातील नोमानी संस्थेच्या नर्सिंग इन्स्टिट्यूटला भेट देऊन मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी 2021 च्या नर्सिंग बॅचमधून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या शपथग्रहण सोहळ्यातही भाग घेतला.

बेळगावातील नोमानी संस्थेच्या नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन आणि 2021 च्या नर्सिंग बॅचमधून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या शपथग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी वसतिगृहाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी 2021 च्या नर्सिंग बॅचमधून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या शपथग्रहण सोहळ्यातही भाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी एकत्रितपणे, आपण भावी पिढ्यांना पाठिंबा देणे आणि सशक्त करणे सुरू ठेवूया, असे जग निर्माण करूया जिथे प्रत्येकाला शिक्षण आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी समान संधी उपलब्ध असतील असे त्यांनी सांगितले. यावेळी नोमानी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि विध्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments