Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले सैनिक भवन बांधण्याचे आश्वासन

Share

अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटना बेळगाव जिल्हा शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महिला शाखेच्या सर्व सदस्यांनी शहरात सैनिक भवन बांधण्यासाठी जागा देण्याचे निवेदन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना सादर केले.

 

यावेळी अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसाप्पा तलवार, सरचिटणीस जगदीश पुजेरी, कोषाध्यक्ष शिव बसप्पा कडण्णा, महिला शाखेच्या अध्यक्षा गौरम्मा अक्कण्णा, उपाध्यक्षा रेणुका पाटील, संघटनेचे सर्व पदाधिकारी व जिल्ह्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी लवकरच सुसज्ज सैनिक भवन बांधून देण्याची जबाबदारी माझी आहे असे सांगून सर्व माजी सैनिकांना सैनिक भवन बांधून देण्याचे आश्वासन दिले.

Tags: