बेळगाव-पणजी महामार्गावर करंबळजवळ दुचाकीने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला.


हेब्बाळ गावातून आपल्या सीडी डिलक्स दुचाकीवरून बेळगावकडे जात असताना करंबळ गोवा कत्रीजवळ बेळगाव- पणजी महामार्गावरील पुलाच्या उजव्या बाजूने सर्व्हिस रोड न घेता अचानक डाव्या बाजूने जाऊन बेळगावहून लोंढ्याकडे जाणाऱ्या कारला दुचाकीने धडक दिली. या अपघातात 45 वर्षीय शशिकांत यल्लाप्पा मादार हा दुचाकीचालक जागीच ठार झाला.
काल रात्री ९ च्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.


Recent Comments