शासकीय प्री-ग्रॅज्युएट कॉलेजमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी खानापुरात अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली.

शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयांत विध्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी खानापुरातील शिवस्मारक चौकात आज अभाविपतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी मानवी साखळी तयार करून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पिण्याच्या पाण्याची कमतरता, वाचनालयाचा अभाव, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, खानापूरच्या प्री-ग्रॅज्युएट कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र,

जीवशास्त्र व रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळांचा अभाव, खोल्यांचा अभाव आहे. यामुळे गरीब विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एक महिन्याच्या आत या समस्यांचे निराकरण न झाल्यास तीव्र लढा देऊ असा इशारा निवेदनात दिला आहे.


Recent Comments