EVENT

उद्या वडिलांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा दिवस : ‘फादर्स डे’

Share

वडील आणि मुलांमधील नातं खूप खास असतं. हे नातं अधिक खास करण्यासाठी आपण दरवर्षी ‘फादर्स डे’ (Father’s Day 2023) साजरा करतो. फादर्स डे अनेक देशांमध्ये जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या निमित्ताने फादर्स डे चं महत्त्व आणि इतिहास नेमका काय ते जाणून घेऊयात.


फादर्स डे’ चा इतिहास
‘फादर्स डे’ ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी फादर्स डे 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. खरंतर, वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड या मुलीने आपल्या वडीलांच्या आठवणीत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1909 मध्ये सुरु झालेल्या मदर्स डे पासून मिळाली.
‘फादर्स डे’ थीम 2023
यंदाच्या फादर्स डेची थीम ‘Celebreting the greatest Hero’s of our life’ (सेलिब्रेटिंग द ग्रेटेस्ट हिरोज ऑफ अवर लाईफ) अशी आहे.
‘अशी’ मिळाली या दिवसाला मान्यता

1916 मध्ये अमेरिकेमध्ये राष्ट्रपती वुडरो विल्सन यांनी या दिवसाला जागतिक स्तरावर साजरा करण्याची मान्यता दिली होती. त्यानंतर 1924 मध्ये राष्ट्रपती कॅल्विन कुलिज यांनी या दिवसाला एक राष्ट्रीय आयोजन म्हणून घोषित केलं. त्यानंतर 1966 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिस-या रविवारी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर 1972 मध्ये राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी पहिल्यांदा या दिवसाला अधिकृतरित्या साजरा करण्याची घोषणा केली.
खरंतर ज्याप्रमाणे आपण आपल्या आईसाठी मदर्स डे साजरा करतो त्याप्रमाणेच आपले वडिलही आपल्यासाठी किती खास आणि महत्त्वाचे आहेत हे दाखवून देण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे. या दिवशी मुलं आपल्या वडिलांसाठी खास सरप्राईज प्लॅन करतात. त्यांना भेटवस्तू देतात. थोडक्यात आपले वडील आपल्यासाठी किती खास आहेत त्याची जाणीव मुलं त्यांना या गोष्टींमधून करुन देतात. ब-याचदा मुलं जितकी आपल्या आईविषयी असणारे प्रेम मोकळेपणाने व्यक्त करतात तेवढे बाबांविषयी असणारे प्रेम व्यक्त करत नाही. मात्र, या दिवशी तुम्ही बाबांविषयी असणा-या तुमच्या भावना अगदी मोकळेपणाने व्यक्त करु शकतात. म्हणूनच या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे.


फादर्स डे प्रत्येक देशांत एकाच दिवशी साजरा केला जात नाही. फादर्स डे भारतात जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो, तर अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये, पोर्तुगाल, स्पेन, क्रोएशिया आणि इटलीसह इतर देश 19 मार्च रोजी फादर्स डे साजरा करतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी आणि पापुआ न्यू गिनी गिनीमध्ये सप्टेंबर महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो.

Tags: