Chikkodi

बेळवडीत शेतकऱ्यांचे हेस्कॉम कार्यालयाला टाळे

Share

प्रचंड वीज दरवाढ आणि अनियमित व असमर्पक वीजपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर बेळवडीत शेतकऱ्यांनी हेस्कॉम कार्यालयाला टाळे ठोकून संताप व्यक्त केला.

अपुरा वीज पुरवठा आणि वीज दरातील प्रचंड वाढ याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी गावातील शेतकऱ्यांनी हेस्कॉमच्या कारभाराचा निषेध करत कार्यालयाला टाळे ठोकले. बेळवडीसह दोडवाड, ननगुंडिकोप्प, चिक्कबेलीकट्टी आदी गावातील हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन करून कार्यालयाला टाळे ठोकले.

हेस्कॉमचे अधिकारी आश्वासनानुसार वीजपुरवठा करत नाहीत तशातच आता विजेचे दर वाढल्याने शेतकरी संतापले आहेत. त्यातून ही संतप्त प्रतिक्रिया उमटली.

Tags: