पंचमसाली आरक्षण हे प्रशासकीय पद्धतीने मिळायचे आहे. पंचमसाली समाजाच्या आरक्षणाबाबत नव्या सरकारने प्रशासकीय बैठक बोलवावी आणि आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी कुडलसंगम पंचमसाली पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी केली.


बेळगावात पत्रकार परिषदेला संबोधित करताना कुडलसंगम पंचमसाली पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी म्हणाले की, समाजाच्या आरक्षणासाठी पंचमसाली कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यासाठी पंचमसालीसंघर्ष समितीच्या कायदा शाखेची बैठक घेऊन विचारविनिमय करण्यात आला. आमच्या समाजातील बहुतेक वकिलांनी कायदेशीर लढाई लढण्याच्या बाजूने मत व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना लिंगायत पंचमसाली आरक्षण संघर्षाची माहिती आहे. त्यांना याबाबत प्रशासकीय बैठक बोलावू द्या. याबाबत आम्ही सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांची भेट घेऊन आमची न्यायपूर्ण मागणी मांडू. सरकारने पंचमसाली समाजाला प्रशासकीय आरक्षण द्यावे, ओबीसींना केंद्रात आरक्षण मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने पंचमसाली समाजाला सामाजिक न्याय दिला पाहिजे. नुमतीच मुख्यमंत्र्यानी एससी, एसटी, ओबीसी समाजाच्या स्वामीजींची बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी चर्चा केली आहे. त्याचप्रकारे आमची बैठक बोलावून आमचे म्हणणे ऐकून घ्यावे असे त्यांनी सांगितले.
स्वामीजी पुढे म्हणाले की, आम्ही 2-ए आरक्षण मागितले, तर मागील सरकारने 2-डी आरक्षण दिले. आता त्याला उच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे. सगळ्यांना न्यायालयापुढे झुकावे लागेल. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी सरकारने आधी बैठक बोलावून भूमिका मांडावी. पंचमसाली समाजाला 2A किंवा 2-डी आरक्षण द्यायचे हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ठरवू द्या.

पंचमसाली समाजाचे 13 आमदार विजयी झाले आहेत. त्यापैकी पाच जणांना मंत्रिपद द्यावे, अशी आमची मागणी होती. त्यापैकी लक्ष्मी हेब्बाळकर आणि शिवानंद पाटील यांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत. आगामी काळात विनय कुलकर्णी आणि विजयानंद काशप्पण्णावर यांना मंत्रीपद मिळू शकते असा विश्वास स्वामीजींनी व्यक्त केला.
शिवानंद जामदार साहेब लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी यासाठी लढत आहेत. येत्या काही दिवसांत सरकार त्यांना बोलावून त्यांच्याशी बोलू शकते. माझा संघर्ष केवळ पंचमसाली समाजाला आरक्षण देण्यावर केंद्रित आहे असे स्वामीजी म्हणाले.
पत्रकार परिषदेला आर के पाटील, सिद्धनगौडा पाटील, प्रकाश पाटील, पोलीसपाटील, आर पी पाटील, राजीवगौडा आदी उपस्थित होते.


Recent Comments