Accident

अचानक लागलेल्या आगीत लाखोंचा कापूस जळून खाक

Share

शेतातील घराला अचानक लागलेल्या आगीत लाखोंचा कापूस जळून खाक झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील येलगोड गावात घडली आहे.


विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील येलगोड गावातील मोसीनपटेल हुसेनपटेल कनमेश्वर यांच्या शेतातील घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला. घरात कोणी नसताना अचानक आग लागली आणि 150 हून अधिक कापसाच्या गोण्या जळून खाक झाल्या. घरातील गुरांना स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कलकेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

Tags: