बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी कुवेंपूनगरला भेट देऊन स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. लवकरच स्थानिकांच्या समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


कुवेंपूनगरला भेट देऊन आ. राजू सेठ यांनी स्थानिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार सेठ व स्थानिकांच्या हस्ते रोप लागवडीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर प्रभाग क्रमांक 32च्या माजी नगरसेविका अनुश्री देशपांडे व कुवेंपू नगरवासीयांच्या वतीने नूतन आमदार सेठ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात बसवराज सुधाकर राव, निवेदिता आवटे, राजेंद्र वगन्नावार तसेच कुवेंपूनगरमधील रहिवासी उपस्थित होते.


Recent Comments