चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या हंडयानवाडी गावाची बससेवा आज अनेक दिवसांच्या मागणीनंतर सुरु झाली. विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व आ. गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नाने ग्रामस्थांचे अनेक दिवसांचे स्वप्न साकार झाले आहे.


जवळपास तीन वर्षांपासून रस्ता सुस्थितीत नसल्याचे कारण देत हंड्यानवाडी गावची बस वाहतूक बंद करण्यात आली होती. गावापर्यंत बसशिवाय भटकणाऱ्या नागरिकांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मुख्य महामार्गाच्या रस्त्यापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे सुमारे 80 लाखांचे अनुदान देऊन त्याचे डांबरीकरण करून आता बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदारांचे मनःपूर्वक आभार मानले. शालेय व महाविद्यालयीन मुले, वृद्ध, माता व सर्व ग्रामस्थांसाठी ही बस अतिशय सोयीची आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्थ काँग्रेसचे नेते माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण दुंडाप्पा जिगन यांच्या हस्ते बसचे पूजन करून करण्यात आली.

यावेळी जक्काप्पा हलप्पा खोत, मारुती सनदी, विठ्ठल खोत, राजेंद्र जिगन, भीमाजी गोणे, भीमा वरगे, निंगाप्पा कुरबर, सुभाष खोत, सिद्धराम जिगन, सिद्धाप्पा मदेनवर, चंद्रकांत बिळगे, हालप्पा केंचना महादजे, हंड्यानवाडी गावचे काँग्रेस कार्यकर्ते आणि केएसआरटीसी डेपो मॅनेजर बी एल निलयज्योती, बसचालक नायकवडी व वाहक सविता हडपद उपस्थित होते.


Recent Comments