मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते 11 जून रोजी विधानसौधच्या प्रांगणात शक्ती व अन्य योजनांचे उद्घाटन होणार आहे. सर्व जिल्हा केंद्रांवर संबंधित जिल्ह्यांचे पालक मंत्री या योजनांना चालना देतील.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज प्राथमिक बैठक घेऊन शक्ती योजना आणि अन्नभाग्य योजना उद्घाटन, गृहलक्ष्मी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आज मंत्री व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
संबंधित जिल्ह्यांचे पालक मंत्री सर्व जिल्हा मुख्यालयात या योजनांचे लोकार्पण करतील. यावेळी मुख्यमंत्री प्रकल्पाच्या लोगोचे आणि स्मार्ट कार्डच्या मॉडेलचे अनावरण करतील.

बैठकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री के एच मुनियप्पा, परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराजू, सरकारच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा, मुख्यमंत्र्यांचे उपमुख्य सचिव डॉक्टर रजनीश गोयल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments