Banglore

अंजली निंबाळकर यांनी केले उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे अभिनंदन

Share

खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून खानापूर तालुक्यात औद्योगिक केंद्रे सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
खानापूर तालुक्‍यात औद्योगिक केंद्र नसल्यामुळे तरुणांचे शेजारील राज्यात स्थलांतर होत आहे. खानापूर तालुक्‍यातील बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी औद्योगीक केंद्रे सुरू करावीत या मागणीचे निवेदन त्यांना दिले. खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी मंत्री एम बी पाटील यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी मंत्री पाटील यांना शाल घालून त्यांचा सत्कार केला. यावेळी मंत्री एम बी पाटील यांच्या पत्नीही उपस्थित होत्या.

Tags: