Agriculture

काँग्रेसवाले सगळे कपटी बुद्धीचे ! : आ. निखिल कत्ती

Share

काँग्रेसवाले सगळे कपटी बुद्धीचे आहेत अशी टीका हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती यांनी केली.

हुक्केरी शहरात आज कृषी विभागातर्फे आयोजित बियाणे वाटप कार्यक्रमात सहभाग घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार निखिल कत्ती म्हणाले की, राज्यातील सत्ताधारी पक्ष काँग्रेस पक्ष गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्याचा विचार करत आहे, हे हास्यास्पद आहे, नुकतेच त्यांनी विधानसभेच्या इमारतीभोवती गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले आहे. आणि आता त्याचा गाय मारण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढे आला आहे. आम्ही हिंदू कोणत्याही परिस्थितीत गोहत्याबंदी कायदा मागे घेऊ देणार नाही, असे ते म्हणाले.


ओडिशा राज्यातील रेल्वे अपघात तांत्रिक दोषामुळे झाला आहे. याची चौकशी सीबीआय करणार आहे, मात्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी हास्यास्पद आहे, असे त्यांनी सांगितले. बाईट.
नंतर त्यांनी ओडिशा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी शहरातील शासकीय कन्नड आणि उर्दू शाळेत मुलांसमवेत मौन पाळून प्रार्थना केली.
यावेळी हुक्केरी ईओ उमेश सिदनाळ, कृषी विभागाचे सहाय्यक संचालक महादेव पटगुंदी, रयत संपर्क केंद्र अधिकारी शिवानंद कामत, नांदणी, राघवेंद्र तळवार, तांत्रिक अधिकारी पुरषोत्तम, उदय अगनूर, दोडमनी, शेतकरी नेते सत्तेप्पा नाईक, परगौडा पाटील, बीईओ मोहन दंडीन, उर्दू हायस्कूलचे एसडीएमसी अध्यक्ष रियाज मुल्ला, राजू कुरंदवडे, राजू मोमीनदादा, कल्पना लोखंडे आदी उपस्थित होते.

Tags: