ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युथ ऑर्गनायझेशनच्या वतीने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आणि दिल्लीत यासाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली.


महिला कुस्तीगीरांच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय निषेध दिवस पाळण्यात आला.
ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युथ ऑर्गनायझेशनने कुस्ती महासंघाच्या अध्यक्षावर योग्य कारवाई करण्याच्या मागणीसाठी 23 एप्रिलपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्तीगीर सुरू असलेल्या संघर्षाच्या समर्थनार्थ आज अखिल भारतीय निषेध दिनाची हाक दिली आहे. महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करणाऱ्या ब्रिजभूषण सिंह व अन्य अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. निषेध सभेला जिल्हा नेते राजू गानगी यांनी संबोधित केले तर विनायक, डॉ. मेघा माळगावी, अस्मिता मेत्री, अनन्या त्यागी आदींनी सहभाग घेतला.


Recent Comments