चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथे विहिरीत 4 फुटांची मगर आढळली. त्यामुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.


एकसंबा शहराच्या हद्दीतील रामनगर येथील शेतकरी सुरेश गिरगावे यांच्या शेतातील विहिरीत सुमारे 4 फुटाची मगर दिसली. सुरेश पहाटे गिरगावे विहिरीत लावलेला मोटार पंप सुरू करण्यासाठी गेले असता मगरीचे दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली. ही विहीर दूधगंगा नदीपासून अर्धा किमी अंतरावर आहे. काही दिवसांत नदीला पूर येऊन आता नदीतील पाणी कमी होत आहे. नदीची पातळी कमी झाली आहे. त्याशिवाय नदीतील पाणी कमी होत असल्याने नदीकाठच्या शेतात मगरींचे वास्तव्य असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
वनविभागाने जनतेतील भीती कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. मगरी पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. नदीकाठच्या शेतीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे अशी नदीकाठच्या शेतकर्यांची मागणी आहे.


Recent Comments