Belagavi

लाला कंपाउंडजवळील चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

Share

बेळगावातील लाला कंपाउंड आणि वनिता विद्यालयाच्या दरम्यान असलेल्या पायवाटेवर नागरिकांचे मोबाईल आणि वाहनात ठेवलेल्या बॅगा चोरण्याचा घटना वाढल्या आहेत. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

धर्मवीर संभाजी चौकाजवळील लाला कंपाउंड आणि वनिता विद्यालयाच्यामध्ये पायवाट आहे. बरेचसे लोक येथे वाहने पार्क करतात तर हिंडलगा, गणेशपूर, चंदगड आदी भागात कामावरून परतणारे नागरिक, विध्यार्थी या पायवाटेने ये-जा करतात. याठिकाणी चोरटयांनी उच्छाद मांडला आहे. विशेषतः

सायंकाळी सात वाजल्यानंतर वर्दळ कमी असल्याची संधी साधून पादचाऱ्यांचा मोबाईल लंपास करण्यात येत आहेत. हातात मोबाईल घेऊन बोलत जाणाऱ्यांचे मोबाईल दुचाकीवरून येणाऱ्या युवकांकडून लांबविल्याच्या घटना येथे वाढल्या आहेत. याबाबत कॅम्प पोलिसात अनेक तक्रारी, गुन्हे दाखल झाले आहेत.

तरीही पोलीस खात्याकडून यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय केले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांत संताप पसरला असून, पोलिसांनी जागे होऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

Tags: