काँग्रेसचे सरकार अस्तित्वात आल्याने वीज बिल भरण्यास जनतेकडून नकार देण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप सरकारचा आदेश आला नसल्याने वीज बिल माफीच्या काँग्रेसच्या घोषणेने हेस्कॉमची डोकेदुखी वाढली आहे.


बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील वीरपूर गावातील लोक वीज बिलाचे पैसे भरण्यास सरळ नकार देत आहेत. वीजबिल मागण्यासाठी गेलेल्या हेस्कॉम कर्मचाऱ्यांना लोक पिटाळत लावत आहेत. आमचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर 24 तासांत 200 युनिट वीज मोफत देण्यात येईल, असे काँग्रेसने निवडणुकीआधी म्हटले होते. त्याचाच आधार घेत आता काँग्रेस सत्तेत आल्याने आम्ही बिल भरत नाही असे लोक म्हणत आहेत. अद्याप शासन आदेश आलेला नाही, तोपर्यंत बिल भरा, असे हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी सांगून वीज बिल न भरल्यास मीटर बंद करू, असा इशारा दिला आहे. त्यावर वीज मीटर बंद होणार असून काँग्रेस सरकार सर्व काही सांभाळणार आहे, अशा शब्दात जनतेने कर्मचाऱ्यांना ठणकावले आहे. याबाबत ग्राहक आणि हेस्कॉम कर्मचारी यांच्यातील मोबाईलवर रेकॉर्ड संभाषण व्हायरल झाले आहे.


Recent Comments