लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह पाच जणांना मंत्रीपद द्या अशी मागणी लिंगायत पंचमसाली समाज कार्यकारिणीने केली आहे.
नवीन लिंगायत पंचमसाली आमदारांच्या सत्कार समारंभावर चर्चा करण्यासाठी बंगळुर येथे राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आला
लिंगायत पंचमसाली समाजाच्या बांधवांच्या आग्रहास्तव आरक्षणासाठी आघाडीवर असलेल्या बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, हुनगुंदचे आमदार विजयानंद काशप्पनवर, धारवाड ग्रामीणचे आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह एकूण पाच आमदारांना मंत्रीपदे देण्याची विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री शिवकुमार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे करण्यात आली.


भाजप प्रदेशाध्यक्ष किंवा विरोधी पक्ष नेतेपदी सक्षम लिंगायत पंचमसाली आमदाराची नियुक्ती करावी, असा आग्रह राष्ट्रीय भाजप नेतृत्वाला करण्यात आला.
नूतन आमदारांचा सत्कार समारंभ व आरक्षण हक्क समारंभ कुडल संगम येथे जून महिन्यात घेण्याचे ठरले.
कूडलसंगम लिंगायत पंचमसाली जगद्गुरु महापीठाचे प्रथम जगद्गुरुबसव जयमृत्युंजय स्वामीजी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वामीजींनी सरकारकडे या मागण्या केल्या.
राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार डॉ. विजयानंद काशप्पनवर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी सभा झाली.
धारवाडचे नूतन आमदार विनय कुलकर्णी, बेळगाव ग्रामीणच्या लक्ष्मी हेब्बाळकर, कागवाडचे राजुगौडा कागे, देवरहिप्परगीचे राजुगौडा पाटील, सिंदगीचे अशोक मनगुळी, कित्तूरचे बाबासाहेब पाटील, माजी आमदार नंदीहळ्ळी हालप्पा, महामंडळाचे माजी अध्यक्ष एम. एस. रुद्रगौडा, विविध लोकप्रतिनिधी, आमदार, पंचमसाली, गौडा, मालेगौडा, दीक्षा, विविध लिंगायत राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा शाखांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
पंचसेना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, बेंगळुरू जिल्हा सरचिटणीस पुट्टराज, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लनगौडा, शिवपुत्र मल्लेवाड, शहर अध्यक्ष, दानाप्पा गौडा, कांतेश, मल्लना गौडा, शैलेंद्र पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments