चिक्कोडी तालुक्यातील विविध भागात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने घरांचे मोठे नुकसान केले.
चिक्कोडी तालुक्यातील काडापूर गावात शेतकऱ्यांच्या चार-पाच घरांची पडझड झाली आहे.

जनावरांच्या गोठ्यांची शेड्स उडून गेल्या आहेत. पिके जमिनीवर पडली आहेत. सोमवारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने योग्य भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
काडापूर गावातील अर्जुन गुरुनाथ यांच्या घरासह चार-पाच जणांची घरे कोसळली आहेत. घरावरील पत्रे, कौले आदी छत उडून गेले आहे. त्यामुळे घरांत पावसाचे पाणी सचिन साठवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने विविध साहित्याच्या नुकसानीची चौकशी करून योग्य ती भरपाई द्यावी, अशी विनंती शेतकरी अर्जुन गुरुनाथ यांनी केली. बाईट
एकंदर सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली आहे.


Recent Comments