Belagavi

सदैव जनतेची सेवा करीत राहणार : डॉ. रवी पाटील

Share

निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी आपण जनतेची सदैव सेवा करीतच राहणार असल्याचे भाजपचे बेळगाव उत्तर मतदारसंघातील पराभूत उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी म्हटले आहे.


बेळगावात रविवारी ‘इन न्यूज-आपली मराठी’सोबत बोलताना डॉ. रवी पाटील म्हणाले की, निवडणुकीत हार-जीत होतच असते. त्यामुळे मी पराभूत झालो असलो तरी सदा जनतेची सेवा करत राहणार आहे. जनसेवेसाठी मी विजया ऑर्थो हॉस्पिटलमध्ये 24X7 उपलब्ध आहे. अडचणीत असलेल्या कोणीही तेथे माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करून त्यांची मी मदत करेन असे डॉ. रवी पाटील यांनी सांगितले.

Tags: