Accident

विजापूर जिल्ह्यात बस-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Share

सरकारी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेबाडी तालुक्यातील उतनाळ क्रॉसजवळ ही दुर्घटना घडली.


31 वर्षीय लालू पवार असे मृताचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील नीळकंठ बागेवाडी हा गंभीर जखमी झाला. जखमी नीलकंठला उपचारासाठी विजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही घटना मनगुळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: