Belagavi

बेळगावात सतीश जारकीहोळी समर्थकांचा विजयोत्सव

Share

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्या नव्या मंत्रिमंडळात केपीसीसी कार्याध्यक्ष व यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांचा कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली आहे. त्यामुळे आनंदी झालेल्या त्यांच्या समर्थकांनी रविवारी बेळगावातील चन्नम्मा चौकात जल्लोषात विजयोत्सव साजरा केला.


कर्नाटकात शनिवारी सिद्दरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच सोहळ्यात केपीसीसी कार्याध्यक्ष व यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील जारकीहोळी समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी बेळगावात त्यांच्या समर्थक व चाहत्यांनी जल्लोषात विजयोत्सव साजरा केला.

शहरातील चन्नम्मा चौकात दलित नेते मल्लेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी गळ्यात सतीश जारकीहोळी व त्यांचे पुत्र राहुल यांचे फोटो अडकवून घोषणा दिल्या. चन्नम्मा चौकातील एका कोपऱ्यात उभारण्यात आलेल्या सतीश जारकीहोळी यांच्या भव्य कटआऊटसमोर जमून सोनिया गांधी, सिद्दरामय्या व सतीश जारकीहोळी यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर रंग फवारून, फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. फ्लो
यावेळी काँग्रेस नेते मल्लेश चौगुले, भाऊ गडकरी यांच्यासह काँग्रेस व दलित कार्यकर्ते सतीश जारकीहोळी यांचे समर्थक, चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: