Chikkodi

वरिष्ठांनी पराभवाचे कारण जाणून घेऊन मार्ग शोधावा : दुंडाप्पा बेंडवाडे

Share

जनतेला काँग्रेसने दिलेल्या 5 गॅरंटी आणि प्रशासनाच्या विरोधाची लाट यामुळे भाजपचा पराभव झाला आहे असे भाजप रयत मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दुंडाप्पा बेंडवाडे यांनी सांगितले.


चिक्कोडी शहरात इन न्यूजशी बोलताना दुंडाप्पा बेंडवाडे म्हणाले की, राज्यात भाजपचा पराभव झाला हे खरे आहे. आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी आणि सत्ताधारी विरोधी लाटेमुळे राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. भाजपने असे पराभव अनेकवेळा पाहिले आहेत. पक्ष पुन्हा संघटित झाला पाहिजे. पक्षाच्या वरिष्ठांनी पराभवाचे कारण जाणून घेऊन मार्ग शोधावा. भाजपच्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. पराजय भ्रष्टाचारामुळे झाला का, या प्रश्नाला उत्तर देताना बेंडवाडे म्हणाले की, भ्रष्टाचार झाला हा काँग्रेस पक्षाचा आरोप निराधार आणि प्रसारमाध्यमांची निर्मिती आहे. बाइट
यावेळी भाजप नेते सतीश अप्पाजीगोळ उपस्थित होते

Tags: